| नागोठणे । वार्ताहर ।
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे युनिटच्या सीएसआर विभागातर्फे मेडिकल मोबाईल व्हॅनचा शुभारंभ शुक्रवार (दि.17) वणी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात करण्यात आला. या मेडिकल व्हॅनच्या माध्यमातून वणी ग्रामपंचायत हद्दितील सर्वच नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत मोफत प्रथमोपचार करण्यात येणार आहेत. या मेडिकल मोबाईल व्हॅनसाठी वणी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रगती आवाद यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला आहे. या मेडिकल व्हॅनचा लाभ ग्रामपंचायतीमधील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
या कार्यक्रमास सरपंच प्रगती आवाद, रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, दिपेंद्र आवाद, वरदा कुलकर्णी, डॉ.किरण सत्वे, एकनाथ रेडेकर, महादेव शेट्ये, शंकर आवाद, एकनाथ सकपाळ, दिपक वनकर, धोंडू दपके, दत्ताराम दपके, उदय धसाडे, संजय नवघरे, महादेव भोस्तेकर, रमण दपके, सुधाकर धार्वे, यशवंत घोगरे, चंद्रकांत वनकर, मनाली आवाद, आश्विनी शिंदे, सुप्रिया कदम, संजना वनकर आशा सेविका, मोनिका आवाद, सुनिता खांडेकर, शालिनी गुजर, सपना दिघे, उर्मिला दिघे, सुनिता नवघरे, श्री. तुरे, अरविंद बुरुमकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.