। पनवेल । वार्ताहर ।
विविध राज्यातून हस्तगत केलेले, हरविलेले 18,38,348 रूपये किंमतीचे एकूण 67 मोबाईल फोन नवी मुंबई आयुक्तालयाअंतर्गत सेंट्रल सीईआयआर पोर्टचा प्रभावीपणे वापर करून हस्तगत केले. मोबाईल चोरीचा सामना करण्यासाठी तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता आणि मोबाईल सुरक्षा वाढविण्याकरीता हा प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. त्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीतील गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण 67 मोबाईल पनवेल शहर पोलिसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मूळ मालकांना हस्तांतरण केले आहेत.