मदनलाल मोकल यांचा सेवापुर्ती कार्यक्रम

। चिरनेर । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील चिरनेर येथील माध्यमिक शाळेत लेखनिक पदावर कार्यरत असलेले मदनलाल नारायण मोकल यांचा सेवापूर्ती गौरव कार्यक्रम पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलनात उपाध्यक्ष तथा उद्योगपती राजेंद्र खारपाटील यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय उत्साही वातावरणात पार पडला.

मदनलाल मोकल यांनी को.ए.सो.च्या रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जबाबदारीने लेखनिक पदावर काम पहिले आहे. सुरुवातीला पनवेल येथील के.वी.कन्याशाळा येथून सुरुवात केल्यानंतर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील केळवणे, व्ही.के.हायस्कूल पनवेल तसेच खालापूर तालुक्यातील द.सी.जाधव माध्यमिक विद्यालय खरसुंडी येथे काम पाहिले. तसेच, मागील 20 वर्षांपासून चिरनेर माध्यमिक विद्यालयात ते काम पाहत होते.

याप्रसंगी शाळेच्या संचालिका अर्चना ठाकूर, व्ही.ए.पाटील, शुभांगी पाटील, मुख्याध्यापक सुरदास राऊत, नाथा नाईक, सुधीर मुंबईकर, किशोर भोईर, सुप्रिया पाटील, प्रा.मंथना म्हात्रे, शिक्षक वृंद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version