| चिरनेर | वार्ताहर |
15 वा वित्त आयोग राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत आमचा गाव आमचा विकास या उपक्रमा अंतर्गत सन 2023- 2024 या पुढील आर्थिक वर्षाकरिता विकास कामांचा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या कामी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार चिरनेर ग्रामपंचायत प्रशासना मार्फत बुधवारी (दि.21) सभा, वंचित घटकांची सभा, महिला सभा व ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरम अभावी दुपारी दोन वाजता असणारी ग्रामसभा तहकूब करण्यात आली.
18 वर्षा खालील बालसभा सकाळी 10 वाजता चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. त्यानंतर अकरा वाजता वंचित घटकांची सभाही घेण्यात आली. त्याचबरोबर चिरनेर येथील रा.जि.प.च्या प्राथमिक शाळेत दुपारी 12 वाजता महिलांची सभा घेण्यात आली. या सर्व सभांचे अध्यक्षस्थान चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष चिर्लेकर यांनी भूषविले होते. शासनाच्या प्रारूप आराखड्यात जलसमृद्धी गाव, आरोग्यदायी गाव व लिंग समभाव पोषक गाव या संदर्भात या सभांचे आयोजन करण्यात आले होते. यात जलसमृद्धी गाव,आरोग्यदायी गाव व लिंग समभाव पोषक गाव या शासनाच्या महत्त्वपूर्ण संकल्पना राबविण्याबाबत वंचित घटक, महिला व बालसभेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वंचित घटकांनी त्यांना भेडसावणार्या समस्या या सभेत मांडल्या. तर जलसमृद्धीमध्ये विहिरी, तलावांच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याबाबत तसेच आरोग्य विषयक शिबिरे लावण्या बाबतची मागणीही या सभेत करण्यात आली. त्याचबरोबर मुलांच्या बालसभेत मुलांनी आरोग्य, शिक्षण व संस्कार याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. असे सरपंच संतोष चिर्लेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान गाव विकासाचा वास्तवदर्शी प्रतिबिंब असणारा हा शासनाचा आराखडा आहे. त्याचा फायदा ग्रामस्थांनी व्यवस्थितरित्या घेतला पाहिजे, असे ग्रामविकास अधिकारी महेश कुमार पवार यांनी प्रास्ताविकेतून विशद केले. या सभेला रा.जि.प.चे सदस्य बाजीराव परदेशी, उरण पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी पाटील, उपसरपंच प्रियांका गोंधळी, ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश फोफेरकर, कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, ग्रामपंचायतीच्या सदस्य शितल घबाडी, ग्रामपंचायत सदस्य सविता केणी, ग्रामपंचायत सदस्य संध्या ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा मोकल, ग्रामपंचायत सदस्य संध्या नारंगीकर, दत्त मंदिर कमिटीचे समाधान म्हात्रे, काँग्रेसचे श्रीधर मोकल, जयेश खारपाटील, दीपक रसाळ, रवी ठाकूर, मानसी म्हात्रे, संताजी ठाकूर, सुनिल ठाकूर तसेच अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित