| अलिबाग | प्रतिनिधी |
पी.एन.पी. वेश्वी शैक्षणिक संकुलाद्वारे ‘प्रभाविष्कार’ या सांस्कृतिक सोहळ्याचे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. होली चाईल्ड इंग्रजी माध्यम स्कूलच्या सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, तर होली चाईल्ड सीबीएसई स्कूलच्या सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी, प्राचार्य संजय मिर्जी, कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, बी. एड. कॉलेजचे प्राचार्य नितेश मोरे, कॉलेजचे डायरेक्टर विक्रांत वार्डे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रीना म्हात्रे आणि इतर मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण केले.