| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात मॉर्निंग वॉक ग्रुप, आंबेपूर-पेझारीचा चांगली प्रसिद्धी आहे. या मॉर्निंग वॉक ग्रुप ग्रुपमुळे आरोग्याचे संवर्धन होते, असे कौतुगोद्गार शिवव्याख्याते मनोज पाटील यांनी काढले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक उमाजी केळुसकर होते. मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
आंबेपूर-पेझारी येथील उपक्रमशील मॉर्निंग वॉक ग्रुपचा बारावा वर्धापन दिन सोहळा सुमंगल कॉटेज, चोरगोंडी येथे बुधवार, 24 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी मॉर्निंग वॉक ग्रुप, आंबेपूर-पेझारीचे अध्यक्ष, कोकण भूषण प्रकाश म्हात्रे यांनी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या समाजपयोगी उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर शिवव्याख्याते मनोज पाटील छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान दिले. सूत्रसंचालन कवी रामचंद्र म्हात्रे यांनी केले.