| पनवेल | प्रतिनिधी |
एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल स्वार गंभीर जखमी होऊन मयत झाल्याची घटना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ओमकार शिंत्रे (22) रा. कोपरखैरणे, हा बुलेट मोटारसायकलवरुन आपल्या घरी जात असताना कुंडेवहाळ येथे आल्यावेळी कंटेनरने ब्रेक मारल्याने त्याने त्याच्या ताब्यातील बलुेटचा ब्रेक मारल्याने मोटारसायकल स्लीप होऊन ओमकार शिंत्रे व त्याचा मित्र खाली पडले. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने, अविचाराने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून त्याच्या वाहनाचे चाक मयत ओमकार शिंत्रे याच्या तोंडावरुन जाऊन त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबतचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील वाघ करीत आहेत.