पेण बाजार समितीचे स्टॅ्रक्चरल ऑडीट
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पेण येथील बाजार समितीची इमारत कमकूवत झाली आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी माजी आ.पंडित पाटील यांनी केली होती. या मागणीची दखल सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रमोेेद जगताप यांनी घेतली आहे. संबंधित विभागाकडून पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याची सुचना पेण येथील सहाय्यक निबंधक यांना दिली आहे. त्यामुळे लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाचे इमारतीचे तपासणी केली जाणार आहे. याबाबतचे वृत्त दि.18 जुलैच्या कृषीवलच्या अंकात प्रसिद्ध झालेले होते.
या इमारतीमध्ये बाजार समितीचे व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे कार्यालय आहेत. तसेच व्यवसायिक गाळे आहेत. इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. या कार्यालयात कर्मचार्यांसह नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. बाजार समितीसह एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयात कामानिमित्त येणार्यांची संख्या प्रचंड आहे. तसेच व्यवसायिक गाळ्यांमध्ये वेगवेगळ्या कामानिमित्त ग्राहक येतात. कर्मचारी सुरक्षेबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न या जीर्ण इमारतीमुळे निर्माण झाला आहे. भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी धोकादायक असलेल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे अशी मागणी पंडित पाटील यांनी केली. याबाबत जिल्हा उपनिबंधक यांना पत्र देण्यात आले होेते. त्या मागणीची दखल घेत संबंधित इमारतीची पाहणी प्राधिकरणाकडून करून घ्यावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास व पंडित पाटील यांना पाठविण्यात यावा अशी लेखी सुचना पेण येथील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांना मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप यांनी केली आहे. पंडित पाटील यांच्या मागणीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्ट्रक्चरल ऑडीटच्या हालचाली सुरु झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे लवकरच या इमारतीचे ऑडीट केले जाणार आहे.
पेण बाजार समितीच्या जीर्ण झालेल्या इमारतीची स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांना पत्र दिले होते. मागणीची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी धोकादायक इमारतीची संबंधित विभागाकडून पाहणी करून त्याचा अहवाल पाठविण्याबाबत संबंधित अधिकार्यांना सुचना केली आहे. या पत्रानंतर संबंधित विभागाने इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडीट करावे.
पंडित पाटील – माजी आमदार