। सुकेळी । वार्ताहर ।
रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान. याच अनुषंगाने नागोठणे जवळच असलेल्या शिहु येथील सुप्रसिद्ध डॉ. पुरुषोत्तम भोईर व डॉ. प्रिया भोईर यांनी दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही एक सामाजिक जबाबदारी व बांधिलकीची भावना म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग येथील सरकारी रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने होणारे हे शिबीर रविवारी (दि. 13) सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत शिहु येथील डॉ. पुरुषोत्तम भोईर यांच्या निवासस्थानी होणार आहे. हे शिबीर सर्वांसाठी खुले असून अधिकाधिक व्यक्तींनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. पुरुषोत्तम भोईर व डॉ प्रिया भोईर यांच्यामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. पुरुषोत्तम भोईर मो.नं.- 9421168177 व डॉ. प्रिया भोईर मो.नं. – 7769976125 येथे संपर्क साधावा.







