नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

। रसायनी । वर्ताहर ।

गुरू पौर्णिमा निमित्ताने तुपगाव येथील श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रात श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट तुपगाव यांच्यावतीने आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 158 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यातील 28 जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी पनवेल येथील झुनझूनवाला आय हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. हे शिबीर पूर्णपणे मोफत होते. नेत्र तपासणीत ज्यांना चष्मा आढळून आला, त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. नेत्र तपासणी शिबिर आयोजित व यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे सिद्धेश्‍वर पाटील, दिलीप साळुंके, हेमंत माने, सचिन कालेकर, कविता फडके, सागर मोरे, हर्षल चौधरी, सपना गुरव, सीमा गुरव, रचना गुरव, कैलास सुपेकर तसेच सर्व पुरुष व महिला सेवेकरी यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version