| माणगाव । वार्ताहर ।
वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र कोकण प्रांताचा विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिर वनवासी कल्याण आश्रम शाळा उत्तेखोल, माणगाव येथे दिनांक 20 ते 23 एप्रिल या काळात संपन्न झाला. या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी प्रदीप पाटील, परशुराम गावित, प्रांत छात्रवास प्रमुख उपस्थित होते. कोकण प्रांतातील आठ पैकी सहा छात्रवासातील एकूण 43 विध्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांच बौद्धिक,मानसिक, जनजाती संस्कृती, जनजाती क्रांतिकारक माहिती, वारली कला असे विविध विषयांवर महेश काळेे, सुदाम पवार, रविंद्र पाटील, उत्तम पाटील, अजित शेडगे, विलास ठाकरे, प्रतिभा पोळेकर यांनी मार्गदर्शन केले.