| पनवेल | वार्ताहर |
चारू मेहताचे आई-वडील जरी डॉक्टर असले, तरी तिचे पायलट होण्याचे स्वप्न होते. तिच्या या स्वप्नाला पाठिंबा देण्याचे धाडस तिच्या आई-वडिलांनी दाखवले. चारू बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेत 93 टक्के गुण मिळवत तिने आपला प्रवास एनडीएच्या दिशेने सुरु केला. एनडीएच्या परीक्षेत ती मेरिट होल्डर झाली. एसएसबी सर्विस सिलेक्शन बोर्ड ऑफ इंडियाची तिची अत्यंत कठीण अशी मुलाखत तब्बल सात दिवस डेहराडून येथील एएफएसबी एरफोर्स सिलेक्शन बोर्डाकडून घेण्यात आली. ही मुलाखत यशस्वीरित्या पर पाडल्यानंतर तिला पुढील प्रशिक्षणासाठी शिफारस मिळाली. आता दि.21 जून रोजी ती एनडीए खडकवासला येथे पुढील प्रशिक्षणासाठी जाणार आहे. तिथे तीन वर्षांचे प्रशिक्षण झाल्यानंर एक वर्ष हैदराबाद येथे झाल्यावर ती वैमानिक पदावर रुजू होणार असल्याचे तिच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. चारू तारक मेहता हिला तिच्या उज्वल यशाबद्दल अभिनंदन करण्याकरिता मा. नगरसेवक मनोज भुजबळ, यशोधन सोसायटीतील पदाधिकारी व ज्येष्ठ बंधू भगिनी उपस्थित होते.





