| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल कळंबोली येथील बीमा कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी येथे जुगार खेळणार्या पाच जणांना ताब्यात घेतले. तसेच या जुगार खेळणार्या मंडळीकडून 13 हजार 055 रुपयांची रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली.
स्टील मार्केट, तिसरा मजला, बीमा कॉम्प्लेक्स, कळंबोली या ठिकाणच्या एका गाळ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यात काही मंडळी तीन पत्ता जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार, पोलिसांनी येथे छापा मारला असता तेथे पाच जण तीनपत्ती जुगार खेळताना आढळले. त्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तेथून 13 हजार 550 रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.