| लाहोर | प्रतिनिधी |
भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून इतिहास रचला. या शानदार विजयाच्या पार्श्वभूमीवर फक्त भारतातूनच नव्हे तर शेजारचा देश, पाकिस्तानमधूनही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. पाकिस्तानेच माजी खेळाडू आणि माजी कर्णधार रमीझ राजाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी भारतीय संघावर स्तुतीसुमनं उधळली. ते इतके उत्तम संघ का आहेत हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं, त्यांचे संघटन भक्कम आहे. त्यांची कामगिरी भक्कम आहे. ते निश्चिंत राहिले. ही निराशाजनक परिस्थिती नव्हती. यावरून भारताबद्दल एक उत्तम गोष्ट दिसून येते. ते एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतात आणि त्याचे परिणाम तुमच्या समोर दिसतात. तुम्ही क्रिकेट का खेळता हे विसरू नका, कोणत्याही तरूण खेळाडूसाठी हा एक धडा आहे. आपण सर्वजण क्रिकेट खेळतो कारण आपलं त्यावर प्रेम आहे, आपण तो खेळ एन्जॉय करतो असं त्यांनी म्हटलं.
एवढंच नव्हे तर भारतीय महिला संघाच्या विजयावर पाकिस्तानाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही भाष्य केलं. भारताच्या विजयाबद्दल अभिनंदन. भारतीय मुलींनी चांगला खेळ केला आणि खरोखरच त्या विजयासाठी पात्र होत्या. त्यांनी सर्वांना सेलिब्रिशेनचं साजरा करण्याचे कारण दिले. टीम इंडियाची गोलंदाजी आणि फलंदाजीदेखील खूप चांगली होती. त्यामुळे मैदानात संपूर्ण ॲटिट्यूडने उतरले, वावरले, असे ते म्हणाले. टीम इंडियाने व्यापक विजय मिळवला याचा मला आनंद आहे. त्यांनी खूप व्यावसायिकता दाखवली आहे. त्यांनी स्वतःमध्ये खूप बदल केले आहेत असंही त्यांनी पुढे नमूद केलं.







