धैर्य सामाजिक व युवा परिवर्तन संस्थांचा उपक्रम
। पोलादपूर । वार्ताहर ।
ठाणे येथील धैर्य सामाजिक संस्थेच्या प्रयत्नातून आणि युवा परिवर्तन संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यातील नरवीर तानाजी मालुसरे प्राथमिक आरोग्य केंद्र, पितळवाडी येथे अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्याचा उपक्रम पार पडला.
पोलादपूर तालुक्यातील सर्व नागरिकांची आरोग्याबाबत होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी 2 ऑॅक्सिजन सिलेंडर, 2 ऑॅक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन, 200 पीपीई किट, 100 मास्क, 5 पल्स ऑॅक्सिमिटर या वैद्यकीय उपकरणांची देणगी धैर्य सामाजिक संस्थेच्या प्रयत्नातून नरवीर तानाजी मालुसरे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रदान करण्यात आली. ही सर्व उपकरणे इक्विफॅक्स कंपनीने देणगी स्वरूपात दिली. या उपक्रमासाठी युवा परिवर्तन संस्थेचे व्यवस्थापक सुदेश शिंदे, धैर्य सामाजिक संस्था अध्यक्ष ओंकार उतेकर, चाळीचा कोंड गावचे अध्यक्ष चिमाजी शिंदे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष नारायण शिंदे, माजी उपसभापती लक्ष्मण खेडेकर, माजी पोलीस उपनिरीक्षक महादेव उतेकर, बोरावळे ग्रामपंचायत सदस्य वसंत शिंदे, पोस्ट मास्टर नाना जाधव उपस्थित होते. वैद्यकीय मदत स्वीकारण्यासाठी आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ.सोपान वाघतकर, सारिका देशमुख, श्रध्दा सुर्वे उपस्थित होते.