रयतेचे प्रतिपालक ग्रंथाचे प्रकाशन

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक असलेले लेखक डॉ. जितेंद्र भामरे यांच्या रयतेचे प्रतिपालक या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी कल्याणचे आ. राजू पाटील, अविनाश जाधव, प्रकाश भोईर, उल्हास भोईर, डॉ.श्रीनिवास साठे, मोहन पिंपळखरे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा प्रचार व प्रसार पुस्तकांच्या माध्यमातून सातत्याने करत रहा, असे राज ठाकरे यांनी डॉ. जितेंद्र भामरे यांना सूचित केले.

Exit mobile version