। दुबई । वृत्तसंस्था ।
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या ट्वेन्टी-20 क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत सलामीवीर केएल राहुलने एका स्थानाने आगेकूच करीत चौथे स्थान प्राप्त केले आहे. विराट कोहली आणि नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्मा अनुक्रमे 10व्या आणि 11व्या क्रमांकावर कायम आहेत. गोलंदाजांच्या यादीत भारताकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (20वा क्रमांक) सर्वात अग्रेसर आहे, जसप्रित बुमरा 26व्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा एकही खेळाडू नाही.