| रायगड | वार्ताहर |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींची आंतरजिल्हा निमंत्रित निवडचाचणी क्रिकेट स्पर्धा पुणे येथे सुरू आहे त्यामध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींनी चमकदार कामगरी करत साखळी फेरीत अवल स्थान प्राप्त करुन आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सुपरलिग मध्ये दिमाखात प्रवेश मिळवला आहे.
एमसीएच्या स्पर्धेपूर्वी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 3 प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याचा फायदा संघाला झाला. रायगडच्या संघाची कर्णधार रोशनी पारधी हिने लागोपाठ दोन शतके झळकावली असून तीन्हा सामन्यात आपल्या धुवाधार फलंदाजीने एकूण 301 धावा काढून संघाला एक हाती विजय मिळवून दिला. रायगड संघाने सांगली व सिडीए क्लब विरूद्ध विजय मिळवला तर हिंगलो संघा विरूद्ध पावसामुळे सामना अनिर्णीत राहिला व दोन्ही संघाला एक गुण देण्यात आला. ग्रुप सी माध्ये रायगडच्या संघाने अवल स्थान प्राप्त केले आहे, लवकरच सुपरलिग फेरीतील सामने सुरू होतील, जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने संघाला नवीन किट व धुवाधार फलंदाज रोशनी पारधी हिला इंग्लिश विल्लो बॅट बक्षिस म्हणून जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी जाहिर केले आहे. संपूर्ण संघाचे व प्रशिषकांचे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. येणार्या क्रिकेट हंगामात मुलींच्या क्रिकेटकडे आपण विशेष लक्ष देऊन मुलींच्या विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.