अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड प्रीमियर लिग क्रिकेट समिती आयोजित पंचवीस वर्षा खालील मुलांची टी-२० क्रिकेट स्पर्धा १५ नोव्हेंबर पासून जेएनपीटी क्रिकेट मैदान आणि रसायनी मोहोपाड येथील एन.आय.एस.एम च्या क्रिकेट मैदानावर सुरू होत आहे.तत्पूर्वी ह्या स्पर्धेचे शानदार उदघाटन आज दिनांक १४ नोव्हेंबर रोजी अलिबाग येथील कुरूळच्या क्षेत्रिय समाज हॉलवर रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे.सदरच्या उडघटनाच्या कार्यक्रमासाठी अलिबाग-मुरुडचे आमदार तथा अलिबागचे नगराध्यक्ष तथा अलिबाग तालूका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांतशेठ नाईक, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष व जिल्हा माध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक,खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत साबळे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अँड.प्रथमेश पाटील,जिल्हा परिषदचे सदस्य राविशेठ पाटील,सुप्रसिद्ध उद्योजक मार्फी क्रियाडॉ,रायगड प्रीमियर लिगचे अध्यक्ष राजेश पाटील , सचिव जयंत नाईक,उपाध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान,आनंद घरत,जितेंद्र नाईक,कौस्तुभ जोशी सह संपुर्ण रायगड जिल्ह्यातील क्रिकेटशी संमधीत मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदरच्या स्पर्धेत रायगड जिल्ह्याती आठ संघ सहभागी झाले आहेत.साखळी स्वरूपात खेळल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेची उत्सुकता सर्व खेळाडूंना व क्रिकेट रसिकांना निर्माण झाली आहे.