। खांब । वार्ताहर ।
रा.जि.प. माध्यमीक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अंतर्गत रोहा तालुका मुख्याध्यापक संघाची सर्वसाधारण सभा रोह्याच्या को.ए.सो. मेहेंदळे हायस्कूल येथे नुकतीच संपन्न करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदासाठी मांडण्यात आलेल्या ठरावाला सर्वांनी अनुमती देऊन मेहेंदळे हायस्कूलचे मुख्याध्यापक रमेश मोसे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी सुरेश जंगम, सचिव दिपक जगताप, सहसचिव शिवाजी डुबळ, खजिनदार श्रीराम काळे यांची पदाधिकारी म्हणून तर सदस्य ज्योत्स्ना मुंढे, अजित देशमुख, ढोले, अन्सारी यांची निवड करण्यात आली आहे. या सभेत संचमान्यता, ऑनलाईंन कामे, पी.एफ., पोषण आहार आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.