कर्जत तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कर्जत तालुक्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस मैदान येथे साजरा झाला. यावेळी प्रांतअधिकारी अजित नेराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर पोसरी येथील शिवतीर्थ येथे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आ. महेंद्र थोरवे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कर्जत तहसील कार्यालय येथे तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी ध्वजारोहण केले. कर्जत नगरपरिषद येथे नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी तिरंगा झेंडा फडकवला. माथेरान येथे नगरपरिषद कार्यालय बाहेर पालिका मुख्याधिकारी आणि प्रशासक राहुल इंगळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कर्जत पंचायत समिती कार्यालय येथे प्रशासक आणि गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी ध्वजारोहण केले. सार्वजनिक बांधकाम विभाग येथे उपअभियंता संजीव वानखेडे, कर्जत पोलीस उपअधीक्षक कार्यालयात विजय लगारे, कर्जत पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड तसेच नेरळ पोलीस ठाणे येथे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Exit mobile version