। मुंबई । प्रतिनिधी ।
रोहित शर्माने नुकतेच कसोटी किक्रेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर त्याने मंगळवारी (दि.13) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे रोहित शर्मा आता राजकारणाच्या मैदानात उतरणार का, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या भेटीसंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, रोहित शर्मा यांची वर्षा निवास्थानी भेट झाली. यावेळी त्यांचे स्वागत केले. या भेटी दरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच, रोहित यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान, या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वानखेडेवर रोहित शर्माच्या नावाचे स्डॅड उभारण्यात आले आहे. या स्टँडचे लवकरच उद्घाटन होणार आहे. त्यासंदर्भात रोहितने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असावी, अशी चर्चा आहे. त्याशिवाय मुंबई टी-20 लीग 26 पासून सुरू होणार होती. मात्र, आयपीएलच्या तारखा पुढे गेल्यामुळे या मुंबई लीगचे नियोजन कसे करायचे, हाही प्रश्न आहे. या स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली असावी, असेही बोलले जातं आहे. रोहित हा मुंबई टी-20 लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.