। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील पुरी गावची समिक्षा सूर्यकांत लहाने हिने मुंबई पोलीस व कारागृह पोलीस या दोन्ही स्पर्धा परीक्षा एकाचवेळी उत्तीर्ण होऊन दैदिप्यमान यश संपादित केले आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या आई-वडीलांनी आपल्या कामधंद्याच्या निमित्ताने मुंबईत स्थलांतर केले हाते. परंतु, दुर्दैवाने एका आजारपणात वडीलांचे निधन झाले. पुढे समिक्षाच्या आईने आपल्या कुटुंबाचा डोलारा सांभाळत आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले. त्यातच समिक्षा ही अत्यंत हुशार व जिद्दी मुलगी असून तिने आपल्या हुशारीच्या व कौशल्याच्या जोरावर शालेय जीवनात विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात पारितोषिक मिळविली आहेत. तिच्या या शालेय जीवनातील खेळातील विविध कौशल्याचा व हुशारीचा फायदा या दोन्ही स्पर्धा झाला असल्याचे तिच्या परीवाराकडून सांगण्यात आले आहे.