| परळी | प्रतिनिधी |
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे. त्यातच आता परळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. मिरवट फाट्यावर राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आहे की घातपात आहे? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.
परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर शनिवारी (दि.11) रात्री एक भीषण अपघात झाला. सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले. त्यात अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात सरपंचाच्या दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर हे रात्री त्यांच्या शेतातून घरी परतत होते. त्यावेळी राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला. हा अपघात आहे की घातपात याचा आता पोलीस तपास करीत आहेत.