वेदक विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शन उत्साहात

| तळा | प्रतिनिधी |

तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री गोपीनाथ महादेव वेदक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, तळा येथे आयोजित करण्यात आलेले शालेयस्तर विज्ञान प्रदर्शन 2026-27 उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, कल्पकता आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता सहावी ते आठवी, नववी ते बारावी, इयत्ता पाचवी तसेच पहिली ते चौथी अशा विविध गटांमध्ये प्रतिकृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, ऊर्जा, सामाजिक समस्या आणि दैनंदिन जीवनातील उपयोगी संकल्पनांवर आधारित विविध नावीन्यपूर्ण प्रतिकृती सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि वैज्ञानिक विचारांचे दर्शन या प्रदर्शनातून घडले. या प्रदर्शनासाठी संस्थेचे अध्यक्ष मंगेश देशमुख, पुरुषोत्तम मुळे, महेंद्र कजबजे, श्रीराम कजबजे, महादेव बैकर, प्राचार्य. डॉ. नानासाहेब यादव, स्नेहल शिंदे, चैत्राली तावडे, सचिन भाटे, लोकरे, मचे, प्रा. संदिप राठोड, प्रा. डॉ. सुजीत जामदार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनातील प्रतिकृतींचे परीक्षण प्रा. डॉ. सुजीत जामदार व प्रा. संदिप राठोड यांनी केले. विज्ञान विभागाचे प्रमुख महाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. टि. एन भुरे, प्रा. बी. डी. शिंदे, प्रा. के. जे. वाडीकर, प्रा. एस. टि. जमादार, प्रा. एन. सी. पाटील आणि सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रदर्शनाचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यात आले.

Exit mobile version