वैद्यकिय महाविद्यालयाच्या भुमीपूजन सोहळ्याचे आयोजन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
उसर येथील नियोजित अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भूमीपूजन सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यासह मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या (दि. 22) अलिबागमध्ये येणार आहेत.
या सोहळ्याच्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज (दि.21) सायंकाळी साडेपाच वाजता पालकमंत्री अदिती तटकरे उसर येथे जाणार असल्याची माहिती माहिती व जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.






