| रायगड | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील रावे जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे महिलांचे नेतृत्व असणाऱ्या शीतल मोरे यांचे पती पक्षाचे कार्यकर्ते राहुल युवराज मोरे यांचे दि. 19 रोजी अपघाती निधन झाले. निधनसमयी ते 37 वर्षांचे होते. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, शेकापचे नेते सुरेश खैरे यांनी पेण येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. त्यांच्यासमवेत पेण तालुक्यातील शेकापचे पदाधिकारी पी.डी. पाटील, प्रल्हाद पाटील, आर.के. पाटील, दीपक पाटील, विनोद पाटील, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
शेकापचे कार्यकर्ते राहुल मोरे हे बुधवारी रात्री आपले काम आटोपून घराकडे येत असताना पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात राहुल मोरे यांचे निधन झाले. राहुल मोरे हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील रहिवासी असून, त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली होती. त्यांच्या पत्नी शीतल मोरे यांनी यापूर्वी रावे जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शीतल मोरे, मुलगी मिहिरा मोरे, भाऊ रोहन मोरे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी 28 ऑगस्ट आणि उत्तरकार्य 31 ऑगस्ट रोजी पेण येथील निवासस्थानी होणार आहेत.