। अलिबाग । प्रतिनिधी ।
नवेदर नवगावच्या उपसरपंचपदी शेकापचे निखिल गजानन कवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने एक अर्ज निखिल गजानन कवळे यांचा तर विकास आघाडीकडून कौस्तुभ सुधीर केनकी यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन सदस्य तर शेतकरी कामगार पक्षाचे सहा सदस्य निवडून आले होते.

ऐनवेळी शेकापचे उमेदवार फोडण्यासाठी बरेच प्रयत्न होऊन सुद्धा शेकापक्षाशी बांधील राहिल्याने विरोधी उमेदवार यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि निखिल गजानन कवळे यांना बिनविरोध निवडून दिले. ग्रामसेवक शेखर बळी यांनी निखिल कवळे यांना बिनविरोध विजयी घोषित केले.
या निवडीबद्दल शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी निखिल कवळे आणि सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे