आ. जयंत पाटील यांच्या निर्देशानंतर खंडाळ्यातील पथदिवे सुरु

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतीचे पथदिवे गेल्या तिन महिण्यापासुन बंद आहेत, त्यामुळे सर्व गावात अंधाराचे साम्राज्य होते, या अन्यायाला कंटाळून खंडाळे ग्रामस्थांनी शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. त्यावर आ. जयंत पाटील यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा करुन शासनाच्या निर्देशानुसार सदर पथदिवे सुरु करण्याची सुचना केली.
खंडाळे ग्रामपंचायतीचे अशोक थळे, नरेश गोंधळी, संजय पाटील, समीक्षा पाटील, रजिता पाटील आदी सदस्य पदाधिकारी यांनी आ जयंत पाटील यांची भेट घेतली. जयंत पाटील यांनी हितगूज साधून तथा वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांशी संपर्क साधून पथदिव्याचं विद्युत पुरवठा ताबडतोब सुरू करण्यात यावा, अशा चर्चा केल्याने व सर्वांची समन्वय घडवून आणल्याने खंडाळे ग्रामपंचायती परिसरातील वीज पुरवठा सुरू होणार असल्याचे सांगितले त्यामुळे खंडाळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत जयंत पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.

Exit mobile version