मोठे शहापूरची शान भारताचा अभिमान
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
“यश त्यांनाच मिळतं,
जे स्वप्नांसाठी मेहनत घेतात,
गरुडझेप घ्यायला पंख नाही,
तर, प्रयत्नच कामी येतात.”
अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर या छोट्याशा गावातील रतिश संतान पाटील याने डिजाईन एरोनॉटिकल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यांचे उत्तुंग यश प्राप्त केले आहे. चेन्नई येथे पार पडलेल्या डिजाईन एरोनॉटिकल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या टिमचे नेतृत्व करून जागतिक स्तरावर भारताला प्रथम क्रमांक मिळवून दिला. शहापूरच्या मातीतला एक अनमोल रत्न जगाच्या क्षितिजावर चमकला.