कशेडी घाटात टँकर पलटी; चालक ठार

। खेड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात केमिकल वाहतूक करणार्‍या टँकर पलटी होऊन अपघात घडला आहे. या अपघातात टँकर चालक केबिनमध्ये अडकून मयत झाला आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास कशेडी गाव हद्दीत घडली आहे.
विश्‍वसनीस सुत्रांच्या माहितीनुसार, टँकर चालक वशिम हा आपला ताब्यातील टँकर (क्र. एम.एच. 04 जे.के.7717) घेऊन वापी ते लोटे खेड असा प्रवास करत होते. या प्रवासात घाट उतरत असताना अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून टँकर पलटी झाला. तर चालक वशिम याचा केबिनमध्ये दबून गेल्याने जागीच मृत्यू झाला.सुदैवाने या केमिकलवाहू टँकरमध्ये हायड्रोक्लोरिक सिड हे केमिकल असून ते ज्वलनशील नसल्याने मोठा अनर्थ टळला.
अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्गाचे सहाय्यक पोलीस फौजदार यशवंत बोडकर तसेच खेड पोलीस ठाण्याचे पीएसआय गडदे यांनी पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेत आवश्यक त्या कारवाईस सुरूवात केले. दरम्यान, पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालू ठेवली आहे.

Exit mobile version