डीपीडीसी योजनेतून उपक्रम
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि कोडींगचे धडे मिळणार आहेत. विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीस लावणे व तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावे याकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत डीपीडीसी योजनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सुरुवातीला 31 शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून, या शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
रोबोटिक्स आणि कोडींगचे बाबत शिक्षकांना लाईफ स्पिक्सही संस्था 3 बॅचमध्ये प्रशिक्षण देणार आहे. यामधील पहिली बॅच नुकतीच अलिबाग तालुक्यातील वयशेत या शाळेत संपन्न झाली. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची आवड निर्माण होणे व दिलेल्या सहित्यामधून विविध शोध लावण्याची सवय निर्माण होणे यासाठी मोठी संधी रायगड जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिली आहे. उपक्रमांतर्गत 31 शाळांना यापूर्वीच रोबोटिक साहित्याचे संच दिलेले आहेत. या साहित्याची ओळख व त्यापासून विविध स्वयंचलित उपकरणे निर्मितीचे प्रात्यक्षिक शिक्षकांकडून तयार करून प्रशिक्षण दरम्यान घेणेत आले, असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी दिली.
यावेळी उपशिक्षणाधिकारी सुनिल भोपळे, समग्र शिक्षा अभियान उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, वायशेत केंद्रप्रमुख विकास पाटील, संदीप वारगे, अक्षय पाटील उपस्थित होते.