| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
मुबंई – पुणे दृतगती मार्गे साताऱ्याहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला टेम्पोने मागून धडक दिल्याची घटना गुरुवार (दि.13) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. ह्या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, एसटी बस मध्ये असलेले 22 प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे. बुधवारी (दि.12) जुन्या मुबंई – पुणे महामार्गावर कोण फाट्यावर वशिवली इथून पनवेलला जाणारी प्रवासी एसटीबस पलटी झाल्याची घटना घडली होती झाडाला धडकून घडलेल्या या घटनेत चालकासहित तीन ते चार प्रवासी जखमी झाले होते. बुधवारी घडलेल्या या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी कळंबोली येथील एसटीच्या अपघातामुळे एसटीप्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.