महिसदरा नदीपात्रावरील पुलाला मोठा भगदाड

| गोवे-कोलाड । वार्ताहर ।

मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्ग 66 वरील पुई ग्रामपंचायत हद्दीतील महीसदरा पुलाला मोठा भगदाड पडला असून हा पुल केव्हाही पडू शकतो. त्यामुळे अखेरची घटका मोजणारा या पुलावरील खड्डे वाहनचालकांसह प्रवाश्यांच्या जिवावर उठत आहे. या पुलाचे तुटेलेले कठडे पुर्ण तोडून नवीन बांधण्यात आले आहेत. तसेच बाहेरून पॅस्टरकरून डागडुजी करून नवीन करण्याचा प्रयत्न फसला असून या पुलावरील मोठमोठे खड्डे नियोजन शुन्य असल्यामुळे शासनाचे करोडो रुपये वाया गेले आहेत.

या पुलाला 50 वर्षांहुन अधिक काळ लोटला असुन तो जीर्ण अवस्थेत आहे. दोन वर्षांपासून हा जीर्ण झालेला पुल नवीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु हा प्रयत्न फसला असून या पुलावर एवढा मोठा खड्डा पडला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंदापूर येथील सभेत सांगितले होते कि एका वर्षभरात मुंबई-गोवा हायवेचे काम पुर्ण होईल. सात ते आठ महिने होऊन गेले तरी या रस्त्याचे कोणतेही काम सुरु झाले नाही.

महिसदरा नदीवरील जीर्ण झालेल्या पुलाच्या बाजूला लॉकडाऊनमध्ये नवीन पुलाचे काम सुरु केले होते. ते अर्धवट स्थितीत ठेऊन जुन्या पुलाची डागडुगी करण्याचा प्रयत्न केला. अशा दुर्लक्षमुळे सावित्री नदी पुलासारख्या दुर्घटना घडतात व नंतर करोडो रुपये खर्च केले जातात. परंतु अनेकांना आपले प्राण गमावावे लागतात. जिव गेल्यानंतर त्याचा उपयोग काय? असे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.

Exit mobile version