1 मार्चपासून जपानी एन्सेफलायटीस लसीकरणाला सुरुवात
| रायगड | खास प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात एक ते पंधरा वर्षे वयोगटातील एकूण नऊ लाख 21 हजार 698 मुला-मुलींना 1 मार्च 2025 पासून पुढे सोळा दिवस लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 288 उपकेंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल नऊ लाख लस मागवण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात सात लाख लसी उपलब्ध होणार आहेत. भारत बायोटेकमार्फत या लसींचा पुरवठा होणार आहे. एका कुपीतून (वायल) पाच जणांना लस टोचता येणार आहे, अशी माहिती जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेखा संकपाळ यांनी ‘कृषीवल’शी बोलताना दिली.
जे.ई हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. तो मेंदूवर परिणाम करतो. हा आजार संक्रमित डासाच्या विशेषत: प्रजातीच्या डासाच्या चावण्याद्वारे पसरतो. हा अतिशय प्राणघातक आहे. प्रामुख्याने पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रभावित करतो. या आजाराची लागण झालेल्यांपैकी 70 टक्के लोकांच्या जीवितास हानी होते किंवा कायमचे अपंगत्व येते. जे.ई व्हायरस हा एलोफेअर व्हायरस आणि डेंगू वायरस जातीचा आहे. जे.ई विषाणू विशेषत: क्युलेक्स विषाणू गटातील क्युलेक्स डासाच्या चावण्याद्वारे प्रसारित होतो. जलपक्षी व डुक्कर या जंतूंची वाढ करतात. तथापि, मानवाकडून मानवाला प्रसार होत नाही. भारतात याचा प्रसार मुख्यतः पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरच्या हंगामात होतो.
आजाराची लक्षणे- ताप, डोकेदुखी, उलट्या, फिट, कोमा
जे.ई प्रतिबंध आणि नियंत्रण नियंत्रण उपाय-वैयक्तिक संरक्षण, अळी नियंत्रण, डुक्कर नियंत्रण. या आजारावर प्रतिबंधक उपचार म्हणून लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. ही लसीकरण मोहीम आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व एकात्मिक बालविकास विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागातील व शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय या सर्व ठिकाणी लस मोफत दिली जाणार आहे. या ठिकाणी कार्यरत असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी, अशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांचा सहभाग नोंदविला जाणार आहे.
जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सज्ज
या लसीकरण मोहिमेसाठी 15 तालुक्यांमध्ये 288 उपकेंद्रे, 1964 गावे, 1788 आशा स्वयंसेविका, 2910 अंगणवाडी कार्यकर्ते, आणि शाळेमधील 3771 शिक्षक, तसेच 311 लस टोचक आणि 155 टीम तयार करण्यात आली आहे. अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले आहे. तरी या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किसन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बाष्टेवाड यांनी केले आहे.
जपानी एन्सेफलायटीस इतिहास
जपानी एन्सेफलायटीस (जेई) ची क्लिनिकल ओळख आणि नोंद 19 व्या शतकात आहे. जेव्हा जपानमध्ये उन्हाळ्याच्या महिन्यांत एन्सेफलायटीसचा वारंवार उद्रेक दिसून आला. 1871 मध्ये जपानमध्ये पहिली क्लिनिकल केस नोंदवले गेली होती. तथापि, हे 1924 पर्यंत नव्हते, जेव्हा 6,000 हून अधिक प्रकरणांचा खुलासा झाला. जपानमध्ये त्यानंतरचे उद्रेक 1927, 1934 आणि 1935 मध्ये नोंदवले गेले. ज्यापैकी प्रत्येकाने रोग आणि त्याच्या प्रसाराच्या पद्धतींचे सखोल समजून घेण्यास हातभार लावला. पुढील दशकांमध्ये जेईचा प्रसार जपानच्या पलीकडे पसरला, ज्यामुळे आशियातील अनेक देश प्रभावित झाले. कोरियन द्वीपकल्पात, 1933 मध्ये प्रथम जेईची प्रकरणे नोंदवली गेली आणि मुख्य भूभाग चीनमध्ये 1940 मध्ये सर्वात जुनी प्रकरणे नोंदवली गेली. 1950 च्या दशकाच्या सुरुवातीला हा विषाणू फिलीपिन्समध्ये पोहोचला आणि पश्चिमेकडे पसरत राहिला. 1983 मध्ये पाकिस्तानमध्ये प्रकरणे नोंदवली गेली. जेईचा सर्वात दूर पश्चिमेकडे पसरला होता. 1995 पर्यंत, जेईची प्रकरणे पापुआ न्यू गिनी आणि उत्तर ऑस्ट्रेलिया (विशेषत: टॉरेस सामुद्रधुनी) पर्यंत पोहोचली होती. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, जेई पश्चिम पॅसिफिक बेटांवर देखील आहे, परंतु प्रकरणे दुर्मिळ आहेत. शक्यतो एन्झूटिक चक्रामुळे जे सतत व्हायरल ट्रांसमिशन राखत नाही. या बेटांमध्ये महामारी केवळ तेव्हाच उद्भवते जेव्हा विषाणू इतर जेई-स्थानिक क्षेत्रातून येतात.