| धाटाव | वार्ताहर |
रोह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे चिंचोली तर्फे आतोणेतील खरबाची वाडी (वडाची वाडी) येथील राजेश जाधव यांचे घर पूर्णतः कोसळले आहे. ही घटना बुधवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली असून, घरातील सामानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेत जाधव यांची दुचाकी व घरातील वापराचे अन्य साहित्य भिजले आहे. तसेच, रात्रीच्यावेळी भर पावसात उघड्यावर राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. पावसाचा अंदाज घेऊन कुटुंबातील इतर मंडळीने तात्पुरता शेजारच्या घराचा आसरा घेतल्याने सुदैवाने कुटुंबातील 5 जण बचावले आहेत. राजेश गोपीनाथ जाधव यांच्यासह पत्नी सविता जाधव, मुलगी वैष्णवी, मुलगा विनायक व राकेश असे पाच जण एकत्र कुटुंब या ठिकाणी राहत होते.