| कोलाड | वार्ताहर |
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी (दि.19) सकाळी 9 वाजल्यापासुन कुंडलिका व महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे प्रशासना तर्फे नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. तसेच, दोन दिवस सतत पडत असलेल्या तुफान पावसामुळे महिसदरा नदीचे पाणी गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्यामुळे गोवे गावाकडे जाण्याचा मार्ग पुर्णतः बंद झाला. तसेच, येथील सर्व भातशेती देखील पाण्याखाली गेली आहे. त्याचबरोबर आंबेवाडी बाजारपेठेत प्रचंड प्रमाणात पाणी साचले असून, त्यातून मार्ग काढतांना नागरिकांची तारंबल उडाली. त्यामुळे येथील नागरीकांसह दुकानदार आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच, गोवे येथील पूरपरिस्थितीला कोलाड पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याची खंत सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी व्यक्त केली आहे.