| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील बँक ऑफ बडोदा येथील कर्मचाऱ्यांच्या ड्राव्हर्समधून दोन लाख 87 हजार रुपयांचे दागिने चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी एका बुरखाधारी महिलेला तिच्या मुलासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
शहरातील प्रभात कॉलनी भागामध्ये बँक ऑफ बडोदा यांची शाखा आहे. या शाखेतील कर्मचारी स्वरूप बालन या कर्मचाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सोमनाथ शर्मा व मानसी गोठल या ग्राहकांनी बँकेत ठेवण्यासाठी दोन लाख 87 हजार रुपयांचे दागिने दिले होते. दुपारच्या सुमारास बुरखाधारी महिलेने या ड्रॉव्हर्स मधील हे दागिने लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग यांनी 24 तासामध्ये महिलेसह तिच्या मुलाला बेड्या ठोकल्या.रफिका लियाकत ढोकळे व साजित लियाकत ढोकळे अशी आरोपींची नावे आहेत.