संकल्पीय तरतूद असूनही काम रखडले; गंजलेला पत्र्यामुळे अनेक जणांना दुखापत
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील दुरशेत येथील बाळगंगा नदीवर असलेल्या पुलाची गंभीर अवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरूस्तीची मागणी तत्कालीन सरपंच दशरथ गावंड यांनी तत्कालीन लोकप्रतिनिधींकडे केली होती. या पुलाच्या कामाला जुलै 2023 ला पुरवणी अर्थ संकल्पामध्ये मंजूरी देखील मिळाली आहे. या कामाला अर्थ संकल्पीय तरतूद 11.09 कोटींची आहे. परंतु, स्थानिक राजकारणामुळे तसेच खरोशी आणि दुरशेत या गावातील समन्वयाच्या आभावामुळे या पुलाचे काम अद्याप सुरुच झालेले नाही.
दुरशेतचे तत्कालीन सरपंच दशरथ गावंड यांनी बाळगंगा नदीवरील दुरशेत ते खरोशी या दरम्यान असलेल्या जीर्ण पुलाची दुरुस्ती अथवा नव्याने पुल बांधण्याची मागणी तत्कालीन आमदारांकडे केली हेाती. परंतु, स्थानिक राजकारणामुळे व खरोशी आणि दुरशेत या गावातील समन्वयाच्या आभावामुळे या पुलाचे काम सुरुच झाले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे जुलै 2023 ला पुरवणी अर्थ संकल्पामध्ये या पुलाच्या कामाला मंजूरी देखील मिळाली आहे. या कामाला अर्थ संकल्पीय तरतूद 11.09 कोटींची असून, या पुलाचे काम आतापर्यंत पुर्ण व्हायला पहिजे होते. परंतु, स्थानिक पातळीवरील असमर्थनामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. दोन दिवसांपूर्वीच जुन्या जीर्ण पुलाचा कठडा तुटून पडला आहे. सुदैवाने यात होणतीही जिवीत हानी झाली नसली तरी भविष्यात मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या पूर्वी पुलाचा गंजलेला पत्रा आणि लोखंडामुळे अनेक जणांना दुखापत झाली आहे.
या पुलामुळे खरोशी व दुरशेत ही दोन्ही गावे जोडली गेली आहेत. या पुलावरून विद्यार्थी, शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्त ये-जा करीत असतात. मात्र, नुकताच कोसळलेल्या पुलाच्या कठड्यामुळे मोठा अपघात होण्याची भिती वर्तविली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दशरथ गांवड यांनी मंजूर असलेल्या पुलाचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी केली आहे. या पुलामुळे स्थानिकांसह नवरात्रीच्या काळात खरोशी येथील केळंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना होणार आहे. तसेच, वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील कायमचा निकाली लागणार आहे. त्यामुळे 11.09 कोटींची तरतूद असतानाही काम रखडणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने याची दखल घेऊन पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू करावे, अशी मागणी दशरथ गावंड यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
समन्वयाच्या अभावामुळे काम रखडले
दुरशेत ते खरोशी या गावांना जोडणाऱ्या बाळ गंगानदीवरील जीर्ण पुलाकडे प्रशासनाचे आणि संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, या पुलाच्या दुरुस्ती अथवा नव्याने पूल बांधण्याची मागणी 2021 मध्येच दुरशेतचे तत्कालीन सरपंच दशरथ गांवड यांनी शासन तसेच तत्कालीन आमदारांकडे केली होती. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकारण आणि दुरशेत व खरोशी या दोन्ही गावांमधील समन्वयाच्या अभावामुळे पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू होऊ शकले नसल्याचे सांगितले जात आहे.
11.09 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद
जुलै 2023 च्या पुरवणी अर्थ संकल्पात या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून, त्यासाठी तब्बल 11.09 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. परंतु, मंजुरी मिळूनही अद्याप कामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या जुन्या जीर्ण पुलाचा कठडा तुटून नदीत कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून, यापूर्वीही पुलावरील गंजलेलेपत्रे व लोखंडी भाग तुटल्याने अनेकांना दुखापत झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.






