। मुंबई । प्रतिनिधी ।
सोन्याची खरेदी करणार्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सोन्याच्या दरात तब्बल 6500 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याची खरेदी करणार्यांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. अलिकडच्या काळात त्याची किंमत गगनाला भिडल्यानंतर आता त्यात मोठी घसरण दिसून येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्यानंतर, सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणार्या सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्स गोल्ड फ्युचर्सच्या किमती प्रति 10 ग्रॅम 92975 रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. 22 एप्रिल रोजी 99358 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचल्यानंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. तर चांदीच्या किमतीत एक टक्क्याने वाढ झाली आहे. आज सकाळी 10 वाजता ती 943 रुपयांनी वाढून 96287 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.