| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पुरुषांच्या 4400 मीटर रिले शर्यतीत भारताचे पदक हुकले. यामध्ये पाचव्या स्थानावर राहिला. भारतासाठी या शर्यतीत अमोज जेकब, राजेश रमेश, मोहम्मद अनास याहिया आणि मोहम्मद अजमल वरियाथोडी यांनी भाग घेतला. टीम इंडियाने ही शर्यत 2 मिनिटे 59.92 सेकंदात पूर्ण केली. अमेरिकेने पुरुषांच्या ु4400 मीटर रिले शर्यतीत विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले. अमेरिकेने ही शर्यत 2 मिनिटे 57.31 सेकंदात पूर्ण केली. फ्रान्सने रौप्यपदक जिंकले. त्याने ही शर्यत 2 मिनिटे 58.45 सेकंदात पूर्ण केली. ब्रिटनने कांस्यपदक जिंकले. त्याने ही शर्यत 2 मिनिटे 58.71 सेकंदात पूर्ण केली. जमैकाचा संघ चौथ्या तर टीम इंडिया पाचव्या स्थानावर राहिला. भारताने 4400 मीटर रिले शर्यतीच्या पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली होती. भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आणि पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाने या कालावधीत 2 मिनिटे आणि 59.05 सेकंद घेतले. यासोबत टीम इंडियाने आशियाई विक्रम मोडला होता.