महाड | प्रतिनिधी |
युनिसेफ सीएससीआर या जागतिक संघटनेच्या सहकार्यातून हरित ग्राम सेवा संस्था महाड यांच्या संयुक्त विद्यमाने महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ परिसरांमध्ये जे सामाजिक कार्य केले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन महाड पंचायत समितीच्या सभापती सपना मालुसरे यांनी केले.
महाड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कुंभे शिवथर येथे हरित ग्राम सेवा संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य, त्याचबरोबर गरजू कुटुंबांना स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून सभापती श्रीमती मालुसरे उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे राजिप सदस्य मनोज काळीजकर, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कडू, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण भोसले, संस्थेचे प्रतिनिधी समीर जाधव, केंद्र शाळेतील शिक्षकांसह अन्य मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
हरित ग्राम सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कडू यांनी आपल्या प्रास्तविकामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कोरोनाच्या संकट काळात आणि महापुराच्या प्रलंकारी काळामध्ये 3 हजार 500 कुटुबांना स्वच्छता किटचे वाटप, तसेच 4 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आतापर्यत संस्थेने महाड आणि पोलादपुर तालुक्यांतील अतिदुर्गम भागांतील कुटूंबीयाना विद्यार्थाना 14 हजार 250 किटचे वाटप करण्यांत आले असल्याचे कडू यांनी सांगितले.आज वुैंभेशिवथर मधील 150 विद्यार्थाना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी या करीता मनोरंजनात्मक साहित्याने भरलेली किट आणि दप्तरांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यांत येत असून, 35 गरजु कुटुबांना स्वच्छता किटचे वाटपदेखिल करण्यात येणार असल्याचे सांगितले.