| म्हसळा | वार्ताहर |
उद्योगपती अदानी समूहातील शेल कंपन्याची 20 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या मोदी सरकारला धारेवर धरल्यामुळे मोदी सरकारने सूडबुद्धीने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून लोकशाहीची पायमल्ली केली असून, देशभरातील काँग्रेस पक्ष मोदी सरकारचा निषेध करीत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी डॉ. मुईज शेख यांनी सांतिगतले. काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
येत्या 15 एप्रिल ते 20 एप्रिल 2023 दरम्यान जिल्हा स्तरावर ’जय भारत सत्याग्रह’ हे आंदोलन घेण्यात येणार असल्याचे जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस सुफियान हालडे यांनीही सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रतिनिधी डॉ. मुईज शेख, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुफियान हलडे, शहर काँग्रेस अध्यक्ष आशफाक काठेवाडी, म्हसळा शहर युवक अध्यक्ष माजीद सुभेदार, शहर काँग्रेस अध्यक्षा नाजिमा मुकादम, शहर पर्यावरण सेल अध्यक्ष येजाज घरटकर, सुहेल फकिह, सुजाउद्दीन काजी, बशीर दोंदीलकर, जलील काजी आदि मान्यवर उपस्थित होते.