| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर पोलिसांनी जनावरांना कत्तलीसाठी नेणाऱ्या दोघांना टेम्पोसह ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. मळािलेल्या माहितीनुसार, मानखुर्द शिवाजी नगर येथील मोहम्मद युसुफ अब्दुलाहा कुरेशी (37) आणि मोहम्मद आरीफ मोबीन अन्सारी (38) हे दोघेजण पनवेल जवळील पळस्पे गावाच्या हद्दीतून पिकअप (एमएच-04-एल क्यू-0905) मधून दोन तांबड्या रंगाच्या गाई व दोन काळया रंगाचे बैल कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पनवेल शहर पोलिंसाना मळािली. माहिती मळिताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक धामापूरकर, पोलीस हवालदार पवार व गुन्हे शाखा आदींच्या पथकाने हा टेम्पो जनावरांसह ताब्यात घेऊन आरोपी विरोधात कारवाई करण्यात आली.







