| अलिबाग | प्रतिनिधी |
आरसीएफ स्थानिक लोकाधिकार समितीच्यावतीने ज्येष्ठ कवी, लेखक वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.27) मराठी भाषा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आरसीएफ कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी समृद्धी सभागृहामध्ये प्रश्नमंजुषा कार्यक्रम सकाळी 9.30 वाजता होणार आहे. याशिवाय सायंकाळी 6.30 वाजता ज्येष्ठ कवी, अभिनेते किशोर कदम उर्फ सौमित्र यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. आरसीएफ कॉलनीतील कम्युनिटी हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांना रसिकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्थानिय लोकाधिकार समितीचे सहकार्याध्यक्ष संजय धारिया, सचिव अभय घरत यांनी केले आहे.