| खरोशी | वार्ताहर |
विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण गरजेचे आहे असे मार्गदर्शन रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी सुनील भोपळे यांनी पेण येथे केले. शिक्षक ज्ञान समृद्धी प्रशिक्षण अर्थात शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षणाचे आयोजन पेण येथे करण्यात आले असून, या प्रशिक्षणाला शुक्रवारी त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
शिक्षकांना मार्गदर्शन करताना भोपाळे म्हणाले की, पेण येथील प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शकाने दिलेले ज्ञान घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी जे जे देता येईल, ते देणे आणि आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवणे, त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक बदल घडून गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या शाळांमध्ये असलेल्या विविध शैक्षणिक साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या हितासाठी करावा, प्रत्येक विद्यार्थ्याला क्षमता विकसित झालेली दिसली पाहिजे, 100 टक्के क्षमता प्राप्त करणे गरजेचे आहे, शिक्षकांनी एक नवी उमेद, नवा उत्साह घेऊन या शैक्षणिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक व पंचायत समितीचे समन्वयक उपस्थित होते.