वृक्ष संवर्धन अत्यावश्यक

। म्हसळा । वार्ताहर ।
पर्यावरणाचा र्‍हास थांबविणे अत्यावश्यक असून पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडीस अनन्य साधारण महत्व आहे. यासाठी वृक्ष लागवडीपेक्षा त्यांचे संवर्धन होणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन म्हसळा तहसिलदार समीर घारे यांनी केले.

शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात वृक्ष लागवड उपक्रम सुरु करण्यात आला असून मंगळवारी (28 जून) वृक्ष लागवडीचे औचित्य साधून म्हसळा तालुक्यातील संयुक्त वनव्यवस्थापन समिती देवघर वनक्षेत्रातील सरवर येथे घेण्यात आला.रोहा वनविभाग क्षेत्रातील सरवर संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांच्या विद्यमाने संपन्न झालेल्या वृक्षलागवड कार्यक्रमास तहसीलदार समीर घारे,वनक्षेत्रपाल संजय पांढरकामे ,वनपाल संजय नवरे, वनपाल सुनिल घोलप, वनपाल दी पक शिंदे, वनपाल विद्याधर गोसावी, रुपेश देवरे, हरिराम बनसोडे, सोनार, इंगोले, भीमराव सूर्यतळ, तलाठी, कोतवाल अमोल शिगवण, वनविभाग म्हसळा येथील वनविभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ आदि मान्यवर उपस्थित होते.म्हसळा वनक्षेत्रापाल संजय पांढरकामे यांनी प्रस्ताविकात वृक्ष लागवडीचे महत्व सांगून वृक्षलागवडीस सुरुवात केली.

तहसीलदार समीर घारे यांनीही वृक्ष लागवड न केल्यास पर्यावरणावर त्याचा विपरीत परिमाण तर होतोच त्याशिवाय तीव्रपाणी टंचाईला सामोरे जावे लागते.त्याची झळ यावर्षी संपूर्ण राज्याला भासविली याचे गांभीर्य प्रत्येकाने लक्षात घेऊन एकतरी झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल संजय पांढरकामे यांनी केले.

Exit mobile version