। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील रांजणपाडा येथील उमेश रामचंद्र पाटील यांचे 4 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी ते 52 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रांजणपाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची 12 वर्षांची मुलगी रिचा हिने मुखाग्नी दिला. उमेश पाटील यांच्या पश्चात पत्नी अंतरा पाटील, मुली रिचा आणि कनिष्का तसेच मोठे दोन भाऊ अनंत पाटील, राजन पाटील आणि चार बहिणी असा मोठा परिवार आहे.
त्यांचे पिंडदान कार्य गुरुवार, 13 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता राहत्या घरी रांजणपाडा येथे करण्यात येणार आहेत. उमेश पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच अंत्ययात्रेला नातेवाईक, मित्र परिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.