विजयकुमार जोशी ठरले महागायक

। चिपळूण । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्हा परिषद वार्षिक स्नेहसंमेलनात चिपळूण पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता विजयकुमार जोशी हे महागायक ठरले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचे 26 वे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 16 ते 18 डिसेंबर 2021 रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त महागायक व महागायिका 2021 या जिल्हास्तरिय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत एकूण 52 स्पर्धक सहभागी झाले असून, अंतिम 25 स्पर्धकांमधून विजयकुमार जोशी यांची महागायक 2021 म्हणून निवड करण्यात आली. याबद्दल जोशी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, वामन कदम, दिनेश सिनकर, सुधाकर मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोख रक्कम, पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version