। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी ब्राम्हण संघाच्या सन 2025 कार्यकारणी निवडीचा कार्यक्रम मोहोपाडा येथील श्री गणेश मंदिरात संपन्न झाला. यावेळी मावळते अध्यक्ष बि.एस.कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन रसायनी ब्राम्हण संघाचे नवीन अध्यक्ष म्हणून विष्णू श्रीराम जोगळेकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी, संस्थापक अध्यक्ष डॉ.विलास कुलकर्णी, माजी अध्यक्ष बी.एस.कुलकर्णी, माजी अध्यक्ष उदय पिंगळे, खजिनदार रविंद्र कुलकर्णी, मोहोपाडा श्री गणेश मंदिर अध्यक्ष व संघाचे सदस्य सुनिल सोमण आदीसह ब्रम्हवृंद उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनय सोहनी यांनी भुषविले. यावेळी संघाची मागील तीन वर्षांत झालेली उन्नती, सकारात्मक वाटचाल याबद्दल विचारविनिमय झाले.